Ad will apear here
Next
‘शतायुषी दिवाळी अंकाचे कार्य अनुकरणीय’
डॉ. जब्बार पटेल यांचे गौरवोद्गार
शतायुषी दिवाळीअंकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) डॉ. राहुल कुलकर्णी,  डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. एस. एम. कात्रक.

पुणे : ‘सध्याच्या डिजिटल युगात आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन गरजेची माहिती, विविध विकाराचे स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहचविण्याचे कार्य शतायुषी दिवाळी अंकाच्या वतीने अव्याहतपणाने सुरु आहे. हा अतिशय अनुकरणीय उपक्रम आहे’, असे गौरवोद्गार नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले. येथील द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चाळीसाव्या शतायुषी दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी डॉ. अरविंद संगमनेरकर, दिवाळी अंकाचे अतिथी संपादक डॉ. राहुल कुलकर्णी आणि जसलोक हॉस्पिटलचे न्युरोफिजिशियन डॉ.एस. एम. कात्रक उपस्थित होते. 

यंदा ‘मेंदू आणि मेंदूचे आजार’ हा दिवाळी अंकाचा मुख्य विषय आहे. या वेळी विविध पुरस्कारही प्रदान करण्यात आले. त्यामध्ये शतायुषी सर्वोत्कृष्ट आरोग्य पुरस्कार - ध्रुव जोशी, शतायुषी सर्वोत्कृष्ट सामाजिक आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण पुरस्कार - डॉ. सुजाता गोडा आणि शतायुषी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार - डॉ. शौनक पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. लेख स्पर्धेतील विजेत्या राजश्री महाजनी यांना प्रथम आणि मेधा जोग यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.  ‘माझा एक अनुभव’ या स्पर्धेच्या विजेत्या  सुस्मिता देसाई यांना प्रथम आणि संपदा वागळे यांना द्वितीय क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आज प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्याचा स्वीकार अनिवार्य असला, तरी लहानपणी शाळेत असताना शिक्षकांनी जी संस्काराची शिदोरी दिली आहे. त्याची सतत आठवण ठेवणे गरजेचे आहे आणि त्याच संस्काराच्या शिदोरीवर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा द्यावी’, अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.

डॉ. संगमनेरकर यांनी स्वागत करून शतायुषी दिवाळी अंकाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. राहुल कुलकर्णी आणि डॉ. सुजाता गोडा यांनी मनोगत व्यक्त केले. 

डॉ. कात्रक यांचे स्मरणशक्ती कशी वाढवावी आणि विस्मरण कसे कमी करावे या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZIVBT
Similar Posts
फ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी पुणे : पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह’ या लघुपट महोत्सवात पुणेकर चित्रपट रसिकांना समीक्षकांनी गौरविलेले फ्रान्स व जर्मनी या देशांमधील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कर्टन रेझर अर्थात पूर्वपीठिका म्हणून या महोत्सवाचे
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १० ते १७ जानेवारीदरम्यान पुणे : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा १० ते १७ जानेवारी, २०१९ दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख संकल्पना असून, त्याअंतर्गत
‘तेजोमय’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन (पीडीए) यांच्या वतीने यंदाच्या तेजोमय दिवाळी अंकाचे २१ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशन झाले. यंदाचा अंक हृदयरोगाशी संबंधित माहिती देणारा हृदयभान विशेषांक आहे. पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉ. जगदीश हिरेमठ आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बी. पी. सिंग, विक्रम गोखले यांचा विशेष सन्मान पुणे : अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेले बी. पी. सिंग आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language